![]()
नागपूर : त्यांना दुसरं काही काम आहे का? असा सवाल उपस्थित करत “फक्त घरात बसून ऊंटावरुन शेळ्या हाकता येत नाहीत. त्याला प्रत्यक्ष फिल्डवर जावं लागतं. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. प्रत्येक नेत्यासह, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री हे ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वत:च्या घरात काय जळतंय ते पहावंठ असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला आहे.
अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद विदर्भामध्ये महायुतीला आहे. मी रामटेकचे उमेदवार राजू पारवे तसंच, नागपूरचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांचं नामांकन अर्ज भरण्यासाठी नागपूरला आलो होतो. विदर्भातील सर्व जागा महायुतीचे उमेदवार जिंकतील, असं चांगले वातावरण आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक चित्र लवकरच स्पष्ट होईल.
‘आदित्य ठाकरेंना दुसरं काही काम आहे का?’
उमेदवारीबाबतचा घोळ दोन-तीन दिवसांमध्ये स्पष्ट होईल. दरम्यान, काल मुंबईत शिवसेना पदाधिकारी बैठकीत शिवसेनेनं अधिक जागा सोडू नये, अशी भावना व्यक्त केली होती. यासंदर्भात छेडले असता “निवडणूक काळात पदाधिकाऱ्यांच्या बैठका या सातत्यानं होतच असतात. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत. आदित्य ठाकरे यांना टीका करण्यापेक्षा दुसरे काही काम आहे का?” असा टोला त्यांनी लगावला आहे.



