आजी-आजोबांचे प्रेम, तर आई-वडिलांचा पाठिंबा मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे मुलांचासुद्धा स्वप्नांचा पाठलाग करण्याचा आत्मविश्वास आणखीन वाढतो. तर या सगळ्या गोष्टींची अनेक मुलांना जाणीव असते आणि आई-बाबा, आजी-आजोबांचे कष्ट पाहून त्यांची प्रशंसासुद्धा करतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. इंडिगो पायलटने त्याच्या कुटुंबासाठी एक खास घोषणा करून अनेक नेटकऱ्यांना भावूक केलं आहे.

 

चेन्नई ते कोईम्बतूर असा प्रवास करणाऱ्या या इंडिगो विमानामध्ये कॅप्टन प्रदीप कृष्णन पायलट असतात, तर या विमानात त्यांचे कुटुंबदेखील त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच प्रवास करणार होते. तसेच अनेकदा आजोबांबरोबर त्यांच्या गाडीवरून या पायलटने प्रवास केला होता; तर ही बाब लक्षात घेता त्यांनी टेक-ऑफपूर्वी आई आणि आजी-आजोबांसाठी एक हृदयस्पर्शी घोषणा केली आहे.