नागपूर : राज्यात महायुती सक्षम असल्यामुळे राज ठाकरे यांच्या पाठिंब्याची गरज नव्हती आणि महायुतीला त्यांची आवश्यकता नव्हती. मात्र त्यांनी पाठिंबा दिला आहे तर लोकसभा निवडणुकीत त्यांचा किती फायदा होईल, हे दिसेलच, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

 

रामदास आठवले नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांचे स्वागत करतो. मात्र त्याचा किती फायदा होईल हे आताच सांगता येणार नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीमध्ये जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले असेल त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला असावा, असेही आठवले म्हणाले.