सातारा : माढा लोकसभा निवडणुकीमुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, असल्याची माहिती समोर आली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी केली त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार, अशा चर्चा आहेत.
काल (गुरुवारी ता. ११) धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली घेतली. यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले. शरद पवार यांच्या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी मध्यरात्रीच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
ऐन निवडणुकीच्या तंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाची मोठी डोकेदुखी होणार आहे.



