आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि YSR काँग्रेस पक्षाचे (YSRCP) अध्यक्ष YS जगन मोहन रेड्डी यांच्यावर शनिवारी रात्री लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान फुले उधळण्यात आली. मात्र त्याचसोबत दगडफेक करण्यात आली. यात मुख्यमंत्री जगन मोहन जखमी झाले आहेत. त्याच्या कपाळावर जखम झाली.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जगन मोहन यांनी विजयवाडामध्ये मेमंथा सिद्धम (आम्ही सर्व तयार आहोत) बस मार्च काढला होता. ते बसवरून उभे राहून लोकांना अभिवादन करत होते. यावेळी त्याच्यावर लोरांनी फुलांसह दगडफेक केली यात ते जखमी झाले.




