
मुंबई : राज कुंद्रा मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं आज अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची 97.79 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. संपत्ती जप्त केल्यानं अभिनेत्री शिल्पा शेट्टीला हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई अंमलबजावणी संचालनालयानं ही संपत्ती जप्त केली आहे. याबाबतची माहिती अंमलबजावणी संचालनालयानं आपल्या एक्स या सोशल माध्यमावरुन दिली आहे.
जुहू आणि पुण्यातील बंगला ईडीनं केला जप्त
अंमलबजावणी संचालनालयानं अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावावर असलेल्या जुहूतील अलिशान सदनिका आणि पुण्यातील बंगला जप्त केला आहे. अंमलबजावणी संचालनालयानं शिल्पा शेट्टीची 97.79 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ही सदनिका आणि बंगला सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावावर आहे, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयानं आपल्या सोशल माध्यमांवरील पोस्टमध्ये शेअर केलीा आहे. त्यासह अंमलबजावणी संचालनालयानं राज कुंद्रा यांच्या नावावर असलेले शेअर्सदेखील जप्त केले आहेत. अंमलबजावणी संचालनालयानं पीएमएलए कायदा 2002 च्या विविध तरतुदीनुसार ही कारवाई केली आहे.



