
नाशिक – नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम आहे. आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत, मात्र माघार घेतल्यानंतर मी नाराज नाही असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. महायुतीच्या जागावाटपात भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवरील दावा सोडल्यानंतर ही जागा शिंदे गटाला मिळाल्याचे बोलले जात आहे.
नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते इच्छुक आहेत. त्यातच ही जागा छगन भुजबळांनी लढावी, असा ठराव समता परिषद आणि ओबीसी संघटनांनी बैठकीत केला आहे. त्यामुळे महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून पुन्हा ट्विस्ट निर्माण झाला आहे.



