
अब की बार, भाजपा तडीपार करायची आहे. कारण, हे आपला महाराष्ट्र लुटत आहेत, आपले उद्योग पळवून नेत आहेत. त्यामुळे, बंडु जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त करा, असे म्हणत महादेव जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी परभणीतील सभेतून केलं. महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव ह्यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची आज परभणीत जाहीर सभा पार पडली. सभेवेळी पाऊस सुरु होता. भरपावसात ही सभा पार पडली.
उद्धव ठाकरे म्हणाले, परभणी हा माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भाजपा आणि मिंध्यांना वाटतं की, सगळं काही पैशाने विकत घेता येतं. पण, परभणीकर हा पैशाने विकला जाणारा नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. तसेच, जय भवानी हा शब्द आपल्या प्रचार गीतामधून काढण्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. मात्र, मी तो शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात करताच, पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी, लोकांनी पावसात भिजून सभा ऐकली. तर, उद्धव ठाकरेही पावसात भिजल्याचं दिसून आले.



