![]()
पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65 व्या वर्धापन दिन साजरा करत असताना बेळगांव, कारवार, बिदरसह सीमा भागातील मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात सामील करण्यासह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अजूनही अपूर्ण असल्याची जाणीव सर्वांच्या मनात आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सीमा भागातील मराठी बांधवांच्या लढ्याला प्रत्येक महाराष्ट्रवासीयांचा पाठिंबा आहे. तसंच सीमा भागातील गावं महाराष्ट्रात सामील होईपर्यंत हा पाठिंबा असणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदान इथं ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी झालेल्या भाषणात अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान दिलेल्यांना अभिवादन
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी योगदान दिलं त्यांना अभिवादन करतो. ज्या ज्या वेळेस अधिवेशन असतं त्या त्यावेळेस राज्यपालाच्या आभीभाषणात बेळगाव प्रश्न मांडला जातो. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरु आहे. आपल्याला सुप्रीम कोर्टाला जाब विचारण्याचा अधिकार नाही. बेळगाव भागातील मराठी भाषिकांना ज्या ज्या सवलती देता येतील, त्या सरकारकडून दिल्या जात आहेत. सुप्रीम कोर्टात सरकारनं चांगले वकील लावले आहेत. यावेळी अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.


