पुणे : राजकारण म्हटले की तडजोड करावी लागते. अनेकदा हट्ट धरला तर नुकसानही होते. युती आणि आघाडीत जागावाटपावरून कोणी एक पाऊल मागे टाकले कोणी पुढे, तिढा काही शेवटपर्यंत सुटला नव्हता. लोकसभेला तर ४८ जागा होत्या. काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. यावेळी २८८ जागा आहेत, यामुळे हा तिढा तर एखादेवेळी युती-आघाडीतही मोठी फूट पाडण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीत जादाच्या जागा जिंकून आणण्याची कुवत असतानाही कमी जागा घेतल्या विधानसभेला तसे होणार नाही असे स्पष्ट संकेत ठाकरे आणि काँग्रेसला देऊन टाकले आहेत.
शरद पवारांनी या जागा आणि कुवतीपेक्षा कमीच घेतल्याचा दावा केला आहे. विधानसभेलाही महाविकास आघाडीने एकत्रच लढावे असे मला वाटत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. लोकसभेला 48 जागाच होत्या, माझा पक्ष जरी छोटा होता असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष होता. तरीही आम्ही कमी जागा घेतल्या. जास्त जागा घेऊन त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती. परंतु आपण तिघे एकत्र यायचे त्यामुळे सामंजस्य राखले जायला हवे होते, ते आम्ही पाळल्याचे पवारांनी स्पष्ट केले. तसेच विधानसभेला २८८ जागा आहेत, एकमेकांना समजून घेणे सोपे जाईल, असे सांगत यावेळी राष्ट्रवादी कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला दिला आहे.



