
डोंबिवली येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दोन ते तीन किलोमीटरपर्यंत ऐकू आला. आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोटात काही वाहनांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र या केमिकल कंपनीमधील रसायनामुळे दुर्गंधी पसरली आहे.
दरम्यान अमूदान कंपनीतील बॉयलर स्फोट प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमूदान कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती मेहता आणि मलय मेहताविरोधात कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबाना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली आगीच्या घटनेवर शोक व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
ते म्हणाले, “डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलर स्फोटाची घटना दुःखद आहे. 8 जणांना निलंबित करण्यात आले आहे. जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

