
छत्रपती संभाजीनगर : तो येवलावाला म्हणतो की आम्ही 60 टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो की काय? त्यानंतर म्हणे एसटी फुल भरलेली आहे. मी म्हटलं मला दार उघडू दे. त्या एसटीमध्ये एकटाच तंगड्या लांबून बसला आहे, तुला तंगडीसकट बाहेर ओढतो, अशा शब्दात मराठा आंदोलनकर्ते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला.4 जूनला सगळ्यांनी अंतरवाली सराटीकडे या एवढेच आवाहन करतो. करण आरक्षण घेतल्याशिवाय यांना सुट्टी द्यायची नाही. आणि मला उपोषण मागे घेण्याचा आग्रह कोणीही करू नका. करोडोच्या संख्येने मराठ्यांनी एकत्र या. माझा एकच स्वप्न आहे की करोडो मराठ्यांची लेकरं मोठी झाली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
ओबीसी महामंडळ 80 टक्के तुम्ही खाल्लं
भुजबळांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, तुझी नियत चांगली नाही, तुला फक्त खायची सवय लागली आहे. ओबीसी महामंडळ 80 टक्के तुम्ही खाल्लं आहे. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तरी त्यांचाच सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाला विरोध आहे. वंजारी आणि धनगर बांधवांना आपल्या आरक्षणाचा धक्का लागत नाही, तरीही तुम्ही त्यांना तुमच्या सभेला बोलावता असे जरांगे म्हणाले.

