बुलढाणा : ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करुन काही फेरबदल केला तर मी मुख्य निवडणूक आयुक्तांचा खूनही करेन, अशी धमकी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून दिली. याप्रकरणी सुबोध सावजी यांच्यावर बुलढाण्यातील डोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पत्रात सावजी यांनी ईव्हीएम मशीन बद्दल काळजी व्यक्त केली होती.
लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मात्र विरोधकांनी निवडणूक आयोग हा सरकारच्या मर्जीप्रमाणे काम करत असल्याचा आरोप अनेकदा केला. तर, मतदानानंतरही ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामात सीसीटीव्ही बंद असल्यावरुन काही ठिकाणच्या नेत्यांनी आक्षेप घेतले आहेत. आता, यावरूनच माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट अशाप्रकारे उद्विग्न होऊन पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे.