पुणे : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव असल्याचं बोललं जात आहे. मात्र, परभणी लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय जाधव हा सामना झाला होता. या सामन्यात संजय जाधव यांनी बाजी मारली आहे. मात्र, मराठा आरक्षणाचे केंद्र असलेल्या अंतरवाली सराटीमध्ये महादेव जानकर यांना लीड असल्याचे समोर आलं आहे. कालच्या मतमोजणीत जानकर यांना अंतरवाली सरटीत 98 मतांची लीड आहे.
दरम्यान, अंतरवाली सराटीमध्ये एकूण 1160 एवढं मतदान झालं होतं. यापैकी विद्यमान खासदार संजय जाधव यांना 531 एवढी मते मिळाली आहेत. तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना 629 एवढी मतं मिळाली आहेत. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलन स्थळी ओबीसी उमेदवार असणाऱ्या महादेव जाणकरांना 98 मतांची आघाडी मिळाली आहे



