मुंबई: राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या. तर गेल्या निवडणुकीत 23 खासदार निवडून आणणाऱ्या भाजपची 9 जागांपर्यंत घसरण झाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत थेट उपमुख्यमंत्रीपद सोडून देण्याच्या तयारीत आहेत.
यानंतर भाजप पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महायुती सरकार मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वेगवेगळी समीकरण होण्याच्या समीकरणे आहेत.
भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यात सरकार स्थापन केले. यावेळी देवेंद्र फडणीस यांना उपमुख्यमंत्री पद देऊन खच्चीकरण केले. त्याचाच परिणाम भाजपच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्यामध्ये झाला असल्याचे बोलवले जात आहे.



