मुंबई : सांगलीचे नवनिर्वाचित अपक्ष खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम हे सोनिया गांधी यांची भेट घेण्याकरिता दिल्लीतील त्यांच्या 10 जनपथ या बंगल्यावर दाखल झाले आहेत. अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं पत्र दिल आहे.
माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासोबत खासदार पाटील आजच मुंबईला रवाना झाले होते. मुंबईत प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची भेट ते घेणार होते. मात्र मुंबईत अधिक वेळ न दवडता आमदार कदम यांनी खासदार पाटील यांना घेऊन थेट दिल्ली गाठली. दिल्लीत खरगे यांची भेट घेऊन कॉंग्रेसला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले.
पाटील यांच्या कॉंग्रेसला पाठिंबा देऊन सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्याने कॉंग्रेसचे राज्यातील संख्याबळ १४ तर देशात १०० झाले आहे. आज सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेऊन उद्या दोघेही मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार आहेत.



