शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत अण्णा हजारे जागे झाले, यांबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. राळेगणसिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली, याबाबत मी अण्णा हलले, अण्णा बोलले आणि अण्णांनी पत्र लिहिलं याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. पण या राज्यात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये घोटाळेच घोटाळे झाले आहेत. अण्णांनी इलेक्ट्रॉल बॉण्डच्या घोटाळ्यावर अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन जी खंडणी गोळा केली जातेय, त्यावरही अण्णांनी बोलायला पाहिजे.”, असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना अण्णांना खूप काम आहे. फक्त शिखर बँक घोटाळा बघू नका, राज्यात घोटाळेच घोटाळे झाले आहेत. त्यांनी रामलीला मैदानात बसावं, आम्ही त्यांच्यासोबत असू, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
प्रभू श्रीरामानं नरेंद्र मोदींचा पराभव केला. नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाची पूजा केली नाही स्वतःची पूजा केली. अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनेचा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे केवळ मोदींवरच होते, असं म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.



