मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले राज्यातील शिंदे फडणेश पवार सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे असे म्हणत विरोधकांनी घोषणा देऊन रान तापवले. त्यातच आज पहिल्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी वरून घोषणाबाजी करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माघारी येत असताना महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी समोरासमोर आले व जोरदार घोषणाबाजी झाली. काही काळ विधान भावना समोरील वातावरण तंग झाले होते. यानंतर विधान भवनाचे आजचे काम तहकूब करण्यात आले आहे. अधिवेशनाचे पूर्ववत काम उद्यापासून सुरू होईल.



