मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्याने या निर्णयाविरुद्ध शरद पवार गटाकडून आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर आता 16 जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज आठ जुलैपासून सुरू होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले होते. यानंतर दोन्हीही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा केला. हा वाद पुढे निवडणूक आयोगाकडे गेला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे चिन्ह घड्याळ हे अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला होता. याच निर्णयाविरुद्ध शरद पवार गट यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
या प्रकरणात 19 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नोटीस दिले होते. त्यांना चार आठवड्यात याबाबत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. ते अद्याप दाखल केलेले नाही. अजित पवार गटाच्या उत्तरानंतर शरद पवार गटाचे उत्तर असणार आहे.
)


