मुंबई : शिवसेनेची स्थापना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावरील वाद सुरू झाले. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर या विरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालय दाद मागितली आहे.
पक्षाचे नाव व चिन्ह कोणाची यावरील पुढील सुनावणी कोणत्या जिल्ह्याला होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रक मध्ये संभाव्य तारीख नमूद करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे नियमित कामकाज आठ जुलैपासून सुरू होणार आहे.
19 जुलै रोजी शिवसेना आमदार अपात्र प्रकरण सुनावणी
सर्वोच्च न्यायालय शिवसेना आमदार कपातर्ता प्रकरणावर 19 जुलै रोजी सुनावणी हण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गट व शिंदे गट अशा दोन्ही बाजूच्या आमदारांना पात्र ठरवले होते. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे घटाने सर्वोच्च न्यायालयात तर शिवसेना शिंदे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मूळ कागदपत्र सर्वोच्च न्यायालयाने मागवली
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी झाली तेव्हा विधानसभा अध्यक्ष समोर झालेले सुनावणीतील मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने मागून घेतली होती आता सर्वोच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सोमवार दिनाक ८ जुलै पासून सुरू होणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर येथे 19 जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. 19 जुलै रोजी ही सुनावणी झाल्यास ही याचिका सर्वोच्च न्यायालयात ठेवावी की उच्च न्यायालयात ठेवावी याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.


