
यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे,अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांनी पूजाही केली. यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. आजचा दिवस हा अत्यंत पवित्र आहे. आम्ही सिद्धिविनायक मंदिरात प्रार्थना केली. सर्वजण मंगळवारी श्री गणेशाचे दर्शन घेतात आम्हीही गणरायाचे दर्शन घेउन प्रार्थना केली आणि आम्ही गणपती बाप्पाकडे आशीर्वाद मागितले असे ते म्हणाले.


