मुंबई: प्रत्येक निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक मतासाठी ५ हजार रुपये पर्यंत आकडा समोर असताना विधानपरिषद निवडणुकीत मात्र एका मतासाठी ५ कोटी रुपये आकडा निघाला आहे असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
विधान परिषदेच्या ११ जागा साठी १२ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये महायुतीचे सर्व ९ उमेदवार निवडून आले. यामध्ये भाजपचे ५ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २ व शिवसेनेचे २ असे एकूण ९ उमेदवार निवडून आले तर लोकसभा निवडणुकीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला आहे.
महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदानामध्ये तब्बल आठ मध्ये फुटल्याने त्याचा फायदा महायुतीला झाला आहे आणि प्रत्येक आमदाराला पाच कोटी रुपयाचे ऑफर देण्यात आली आहे असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
एरवी मतदार राजांना विकत घेणारे हेच नेते स्वतःवर वेळ आल्यानंतर मात्र मतदाराला पाच हजार रुपये देणारे स्वतः मात्र पाच कोटी रुपये कमवतात का? असावा सवाल राज्यातील जनतेला जनतेच्या मनात येत आहे.


