मुंबई : 12 जुलै रोजी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचे मतदान विरोधी महायुतीला मिळाले होते. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. यावर काँग्रेसने बंडखोर आमदारावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.
या आमदारांवर काँग्रेस हाय कमांड लवकरच कारवाई करणार असल्याची माहती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. याबाबतचा क्लोजर रिपोर्ट दिल्लीत जाऊन हाय कमांडकडे देणार असल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलं आहे. तसंच, या फुटलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याची शिफारसही नाना पटोले करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोण आहेत फुटलेले आमदार
हिरामण खोसकर
जितेश अंतापूरकर
मोहन हंबिर्डे
झिशान सिद्दीकी
सुलभा खोडके
शिरीष चौधरी



