लोकसभा निवडणुकीच्याआधी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर निलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. मात्र, आता निलेश लंके यांच्याबाबत अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना गौप्यस्फोट केला.
‘निलेश लंके आमच्याकडून लोकसभा लढवण्यास तयार होते. पण त्यांना लोकसभा आणि त्यांच्या पत्नीला विधानसभा द्या, अशी अट लंकेंनी ठेवली होती’, असं विधान अजित पवारांनी केलं. आता अजित पवारांच्या या विधानानंतर निलेश लंकेंनी प्रत्त्यु्त्तर दिलं. “लोकसभा निवडणुकीवर आता बोलणं म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणणं चुकीचं आहे”, असा खोचक टोला निलेश लंकेंनी अजित पवारांना लगावला आहे.