
पुणे: राज्यासह आता देशभरात चर्चेत असलेली पूजा खेडकर आणि कुंटुबियांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. आयएएस अधिकारी बनण्यासाठी खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप झालेली पूजा खेडकर आता नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. तिला चौकशीसाठी मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलवण्यात आलं होतं. मात्र चौकशीआधीच पूजा खेडकर गायब झाल्याचं बोललं जातं आहे. पूजा खेडकर मसूरीत ट्रेनिंग सेंटरने दिलेल्या मुदतीत देखील पोहचली नाही. त्यामुळे आता तिच्यावर यूपीएससी आणि दिल्ली पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पूजा खेडकर मसूरीत ट्रेनिंग सेंटरने चौकशीसाठी दिलेल्या मुदतीत देखील पोहचली नाही. त्यानंतर तिला फोन लावण्यात आला मात्र, फोन बंद असल्याची माहिती समोर आली आहे. मसूरीमध्ये चौकशीसाठी पूजा खेडकर गैरहजर राहिली होती. बनावट कागदपत्रे दिल्याने पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीआधीच पूजा खेडकर नॉट रिचेबल
ट्रेनिंग सुरू असताना आपल्या मागण्यांमुळे चर्चेत आलेली वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरनी यूपीएससीला बनावट मेडिकल सर्टिफिकेट दिल्याचं समोर आलं. तिचं राज्यातील प्रशिक्षण रद्द करण्यात आलं. पूजा खेडकरला पुन्हा मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलावण्यात आलं होतं मात्र, त्याआधी ती नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ती चौकशीसाठी देखील मसूरीला न गेल्याने आता तिच्यावर काही कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




