![]()
कोयना धरणाच्या चार वक्र दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग, कोयना धरणात एकूण ७८ टक्के टीएमसी पाणीसाठा, सायंकाळी सातनंतर करणार पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने चार प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या गावांना हाय अलर्टवर ठेवले आहे.
शिवसागर जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने वाढताना सध्या तो ७७ टीएमसीच्या घरात (७५ टक्के) पोहचला असल्याने धरण परिचालन सूचीनुसार धरणाचा किती तारखेला किती पाणीसाठा असावा हे निश्चित असल्याने या सूचीप्रमाणे धरणातून जलविसर्ग करणे अपरिहार्य आहे. त्यानुसार आज गुरुवारी सायंकाळी चार वाजता कोयना शिवसागराचे सर्व सहाही दरवाजे दीड फुटाने उघडून जलविसर्ग करण्यात येणार आहे. तरी कृष्णा, कोयना व पंचगंगा या नद्यांकाठी दक्षतेच्या सुचना जारी झाल्या आहेत.
पश्चिम घाटमाथ्यांसह कोयना पाणलोटक्षेत्रात सलग नऊ दिवस सुरु असलेली कोसळधार आणि हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असतानाच शिवसागर जलाशयाचे सहा वक्री दरवाजे सायंकाळी चार वाजता दीड फुटानी उघडून १० हजार क्युसेक पाण्याचा जलविसर्ग कोयना नदीपात्रात होणार आहे. तर, कण्हेर धरणातून दुपारी १२ वाजता पाच हजार क्युसेकचा जलविसर्ग करण्यात आल्याने कृष्णा- कोयना, पंचगंगा नद्यांच्या जलपातळीत लक्षणीय वाढ होऊन या नद्यांना महापूर येण्याची भीती व्यक्त होत आहे.
महापुराची धास्ती वाढली
कोयना धरणाच्या पायथा विजगृहातून काल १,०५० क्युसेक पाण्याचा कोयना नदीत जलविसर्ग असताना त्यात आता आणखी १० हजार क्यूसेक पाण्याची भर पडणार असल्याने कृष्णा, कोयना आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. सांगली, कोल्हापूरला महापुराची तर, कोयनाकाठी पुराची धास्ती वाढली असून, सलग जोरधारेने पडझड, रस्ते खचणे, बंधारेही वाहून गेल्याने समाजमन सुन्न झाले आहे.



