महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. या योजनेवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरतीच आहे, त्यानंतर ही योजना बंद केली जाईल असा आरोप विरोधक करत आहेत. तर अजित पवार यांनी विरोधकांना उद्देशून पोस्ट केली आहे. अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी खासियत आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ..’ योजना अशा प्रकारच्या योजना आणण्यापेक्षा सरकारने थेट माझा लाडका मतदार योजना जाहीर करून टाकवी असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशी योजना जाहीर केल्यास थेट सगळ्यांना पैसे वाटण्याचा मार्ग मोकळा होईल. बाकी दुसरी काही भानगडच नको, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. तर संजय राऊत यांनीही यावर टीका केली आहे. मात्र विरोधकांना अजित पवारांनी आता पोस्ट करुन उत्तर दिलं आहे.