ejanashakti : छगन भुजबळांच्या नादात देवेंद्र फडणवीस तुम्ही सत्ता घालवून बसणार असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. पाडायचे की उभे करायचे ते ठरवू, पण तुमचा कार्यक्रम आम्ही करु असेही जरांगे पाटील म्हणाले. दरेकर हे लय खवाट, डेंजर भूत असल्याचे जरांगे म्हणाले. हे त्रासलेलं मराठा द्वेषाच भूत मराठा संघटना फोडत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांची शक्ती काय असते ते आम्ही दाखवू थोडा संयम दाखवा असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आता यांची खुर्ची ठेवायचं नाही
सरकारनं पक्क ठरवलं आहे की, मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळं मराठ्यांनी देखील ठरवलं आहे की, यांना आता खुर्ची ठेवायचं नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आम्ही सरकारला आणखी 29 तारखेपर्यंत वेळ दिला असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजामध्ये यांच्याविषयी प्रचंड चीड आहे. त्यांची खदखद बाहेर पडणार आहे.
आमचा जीव आरक्षणात त्यांचा जीव खुर्चीत
तुम्ही जर आरक्षण देणार नसाल तर आम्हाला राजकीय भाषा वापरावी लागेल. मंत्री शंभुराज देसाई आले त्यावेळी शेवटची चर्चा झाली. त्यानंतर सरकारशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मनोज जरांगे पाटील महणाले. आमचा जीव आरक्षणात त्यांचा जीव खुर्चीत, त्यांची खुर्ची आम्ही घालवणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. काय व्हायचं ते होऊद्या असेही जरांगे पाटील म्हणाले. फडणवीसांना आणखी किती दिवस मराठ्यांना वेठीस धरायचे आहे ते बघू असेही जरांगे पाटील म्हणाले.



