![]()
राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील दोन जागांसह नऊ राज्यांतील राज्यसभेच्या रिक्त १२ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानुसार भाजपने रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील यांना तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून साताऱ्यातून नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्या बुधवारी नितीन पाटील राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सातारा जिल्ह्याला खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या रुपाने खंबीर आणि कणखर नेतृत्व नेतृत्व मिळाले होते. आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी त्यांची धुरा सांभाळली वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात आ.मकरंद पाटील हॅट्रिक करून मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. नितीन पाटील सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यातच त्यांना राज्यसभेवर खासदारकी मिळाल्याने वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघात दिवाळीचे वातावरण निर्माण झाले आहे
अजित पवारांनी शब्द पाळला
उदयनराजेंसाठी सातारा लोकसभा जागेवरून माघार घेणाऱ्या नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. नितीन पाटील बुधवारी मुंबई विधान भवनात अर्ज भरण्यात येणार आहे.
आसाम – मिशन रंजन दास , रामेश्वर तेली
बिहार – मनन कुमार मिश्र
हरियाणा – श्रीमती किरण चौधरी
मध्य प्रदेश – जॉर्ज कुरियन
महाराष्ट्र – धैर्यशील पाटील
ओडिशा – श्रीमती ममता मोहंता
राजस्थान – सरदार रबनित सिंह बट्टू
त्रिपुरा – राजीव भट्टाचार्जी


