ejanashakti : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतळे अनिल सावंत यांनी पुण्यात विधानसभेसाठी थेट शरद पवारांची भेट घेतली आहे. पंढरपूर मंगळवेढा जवळच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार ते पाहतात. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छूक असल्याचं कळतंय. आमदारकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत तुतारी हाती घेण्याचे मनसुबे दिसत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढ्याची जागा सध्या भाजपकडे असून तिथे सध्या समाधान अवताडे हे आमदार आहेत. या जागेसाठी भाजपचेच दोन माजी उमेदवार इच्छूक असून राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्याचे त्यांचे मनसुबे असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याने शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून या जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात लोकसभा निवडणूकीनंतर आता विधानसभा निवडणूकांचे वेध लागले आहेत. दरम्यान काका पुतण्याच्या राजकारणात आता नवा डाव खेळला जात असल्याची चर्चा आहे. महायुतीतील आमदाराचा पुतणा आमदारकीची इच्छा व्यक्त करत थेट शरद पवारांच्या दारात गेल्याचं दिसून येतंय. इच्छूक उमेदवारांच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात येण्यासाठी पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
विधानसभेच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूकीसाठी अनिल सावंत इच्छूक असून ही जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छूक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.