मुंबई : महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वी पक्षाच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांतील उमेदवारांना राष्ट्रवादीच्या (अजित पवार) वतीने उमेदवारी पत्र ( ए व बी फॉर्म) सोमवारी सादर करण्यात आले. त्यात छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ आदी नेत्यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने २० उमेदवारांना पक्षाचे अधिकृत उमेदवारी पत्र देण्यात आले. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पक्षाने या नेत्यांना अधिकृत पत्र सादर केले आहे. २० उमेदवारांना पत्र देण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी पक्षात दाखल झालेले इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे.
उमेदवारी पत्र कोणाला?
अजित पवार (बारामती), छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), धनंजय मुंडे (परळी), अनिल पाटील (अंमळनेर), धर्मरावबाबा आत्राम (अहेरी), आदिती तटकरे (श्रीवर्धन), संजय बनसोडे (उदगीर), दत्तात्रय भरणे (इंदापूर), माणिकराव कोकाटे (सिन्नर), हिरामण खोसकर (ईगतपुरी), दिलीप बनकर (निफाड), सरोज अहिरे (देवळाली), आण्णा बनसोडे (पिंपरी), भरत गावित (नवापूर).