मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मविआमधील घटक पक्ष असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यामध्ये जागावाटपच निश्चित होत नव्हत्या. तिन्ही प्रमुख पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा सुरू होत्या. शिवसेना व काँग्रेस यांच्यातील मुंबई आणि विदर्भातील काही जागांवर वाद समोर आले होते.
जागावाटपात काँग्रेस ८५, शिवसेना ८५ तर राष्ट्रवादीला ८५ जागा लढविण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. डावे पक्ष, समाजवादी पार्टी व अन्य छोट्या पक्षांना तिन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातून जागा सोडाव्यात, असा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, महाविकास आघाडीत कोण लहान भाऊ आणि कोण मोठा भाऊ यावरून वाद सुरू होता. परंतु, या जागा वाटपामुळे आता हा वादच संपुष्टात आला असून महविकास आघाडीत सर्वच समसमान आहेत.



