
मुंबई : महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीने आतापर्यंत 182 जागांवर उमेदवार घोषित करत आघाडी घेतली आहे. भाजपने पहिल्या यादीत 99 जणांची नावे जाहीर केली. शिंदे गटाकडून 45, तर अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. तिन्ही पक्षांकडून वादात असलेल्या जागांवर उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे महायुतीमध्येही महाविकास आघाडीमध्येही वाद असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल दिल्लीला रवाना झाले आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट होती. तथापि, न झाल्याने ती आज होत आहे. या भेटीत जागा वाटपावरच चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होत आहेत.
अमित शाह यांनी शिंदे आणि दादांना जागावाटपात तडजोड करण्याचा सल्ला दिला आहे. महायुतीमध्ये शिंदेंच्या तुलनेत अजित पवारांना कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपातील 106 जागांवर अंतिम तोडगा काढण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण आहे.
