महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी दुसरी यादी जाहीर केली त्यात अमित ठाकरे यांचं नाव होतं. त्या यादीची चर्चा सुरु झालेली असतानाच आता मनसेने तिसरी यादी जाहीर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यामध्ये १३ उमेदवारांना संधी दिली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
कोण आहेत हे १३ उमेदवार?
मंगेश पाटील, अमरावती
दिनकर पाटील, नाशिक, पश्चिम
नरसिंग भिकाणे, अहमदपूर-चाकूर
अभिजित देशमुख, परळी
सचिन रामू शिंगडा, विक्रमगड
वनिता कथुरे, भिवंडी ग्रामीण
नरेश कोरडे, पालघर
आत्माराम प्रधान, शहादा
स्नेहल जाधव, वडाळा
प्रदीप वाघमारे, कुर्ला
संदीप पाचंगे, ओवळा-माजिवाडा
सुरेश चौधरी, गोंदिया
अश्विन जैस्वाल, पुसद



