सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच आता उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील उमेदवाराने एक आश्वासन दिल आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होणार
राज्यातील हायव्होलटेज असलेल्या मतदारसंघांपैकी असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. तसेच बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होणार आहे. मात्र आता महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रचाराचा शुभारंभ देखील केला आहे.
या प्रचाराच्या रणधुमाळीत राजेसाहेब देशमुख यांनी जनतेला अजब आश्वासन दिल आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा देखल रंगली आहे. यावेळी राजेसाहेब देशमुख म्हणाले की, परळीतील तरुण पोरांना लग्नासाठी विचारताना लोक विचारतात की पोराला नोकरी आहे का? तर आता सरकारच नोकरी देत नाही तर कशी लागणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.



