जागतीक पातळीवर सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिकामधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. याचा परिणाम हा जगभरातील शेअर मार्केटवर दिसून आला. सराफा मार्केटवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सोन्याने पुन्हा जोरदार आघाडी घेतली आहे. तर, चांदीमध्ये मात्र सध्या घसरणीचे सत्र दिसून येत आहे.
मागच्या आठवड्यात सोने 2,000 रुपयांनी महागले होते. नंतर त्यात 770 रुपयांची घसरण झाली होती. या मंगळवारी सोने 150 रुपयांनी उतरले होते. तर काल 6 नोव्हेंबररोजी किंमत 150 रुपयांनी वाढली. आज सकाळच्या सत्रात सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीमध्ये सध्या घसरण दिसून येत आहे. या आठवड्यात चांदीत मोठा बदल दिसला नाही. तर 5 नोव्हेंबर रोजी चांदी 1 हजार रुपयांनी घसरली होती. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये इतका आहे.




