जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात खळबळजनक बातमी समोर आली आहे. कारण ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगाव येथील मेहरुण परिसरात आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार झाला आहे. त्यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार झाला आहे. मात्र या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेवेळी अज्ञात इसमाने हुसेन यांच्या घरावर बंदुकीच्या तीन गोळ्या झाडल्या गेल्या.
महत्वाचं म्हणजे अहमद हुसेन शेख यांचे घर हे मेहरुण परिसरातील शेरा चौकात आहे. अशातच आज पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


