विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय उमेदवारांसह कार्यकर्त्यांचं टेन्शन वाढलं आहे. अशातच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार, राज्यात महायुतीला सर्वात जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून जोरदार लढत होणार असल्याचं दिसून येत आहे. मात्र असं असलं तरी सत्तेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. परंतु, राज्यात नेमके कोणते अपक्ष उमेदवार विजय मिळवू शकतात हे आपण जाणून घेऊयात…
अपक्षांकडे फिल्डिंग लावायला सुरूवात
राज्यात विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती आणि महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. परंतु,राज्यात अपक्षांसोबतच लहान पक्षांच्या आमदारांची देखील मदत घ्यावी लागणार आहे.
त्यामुळे मनसे, वंचित, शेकाप, बविआ आणि प्रहारसोबतच अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. मात्र आता कोणत्या मतदारसंघात अपक्षांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे हे आपण पाहुयात…
विजयाची शक्यता असलेले अपक्ष उमेदवार कोणते? :
रवी राणा – बडनेरा
समीर भुजबळ – नांदगाव
विजय चौगुले – ऐरोली
राहुल जगताप – श्रीगोंदा
सत्यजीत पाटणकर – पाटण
राजेंद्र मुळक – रामटेक
सुधाकर घारे – कर्जत, रायगड
रमेश आडसकर – माजलगाव
राजेश लाटकर – कोल्हापूर उत्तर
भिमराव धोंडे – आष्टी पाटोदा



