महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास अवघे काही तास बाकी असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार पडले तेव्हा 50 खोके हा मुद्दा चांगलाच गाजला होता. राऊत यांनीच सर्वप्रथम 50 खोक्यांचा उच्चार केला होता.आता विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
अपक्षांना 50 ते 100 कोटींची ऑफर?
त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर त्यांनी लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना पैशांच्या थैल्या पाठवल्या नसत्या, असंही राऊत म्हणाले आहेत. दोन चार टक्क्यांच्या आधारावर भाजपाच्या जागा कशा वाढतात?,कुठे चार टक्के वाढतात तर हरियाणात सहा टक्के वाढ, निवडणूक आयोगाने मार्गदर्शन करावं. याबाबत महाराष्ट्राला सांगावं, असंही ते म्हणाले.
“सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर तिथे लहान पक्ष आणि अपक्ष येतात. पण आमच्याबरोबर शेतकरी, कामगार वर्गाचे नेते, समाजवादी, डावे पक्षाचे आमदार येतील. अपक्ष उमेदवारांनीही पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे”, असंही ते म्हणाले आहेत. राऊत यांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.



