
महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे पुन्हा प्रयत्नशील होते. २०२२पासून दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी वाढलेली जवळीक शिंदेंसाठी आशादायक होती. गेला आठवडाभर शिंदे यांनी त्यादृष्टीने पुरेपूर प्रयत्न केले. मात्र, भाजपचे १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजप श्रेष्ठींनाही फडणवीस यांच्या निवडीशिवाय पर्याय उरला नाही.
दिल्लीत झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाने शिंदे यांना स्पष्टपणे तसे कळवले होते. त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, आज शपथविधीचा दिवस. राज्याला आज नवं सरकार मिळणार आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथ घेणार असले तरीही इतर मंत्र्यांबाबतची भूमिका सस्पेन्स आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांतच चित्र स्पष्ट होईल.



