मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता शपथ घेणार आहेत हे निश्चित झालं आहे कारण विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या आमदारांनी एकमुखाने निवड केली आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे संकेत निश्चित होतेच. त्या सगळ्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे हे नाव त्यात असेल का? यावर उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता शपथ घेणार आहेत हे निश्चित झालं आहे कारण विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या आमदारांनी एकमुखाने निवड केली आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे संकेत निश्चित होतेच. त्या सगळ्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे हे नाव त्यात असेल का? यावर उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे.



