![](https://ejanashakti.com/wp-content/uploads/2024/09/Screenshot_20241004_155821_Adobe-Acrobat.jpg)
मुंबई : थोड्याच वेळात विधानसभेच्या विशेष अधिवेशन 2024 ला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी गुलाबी फेटे घालून विधानभवन परिसरात प्रवेश केला. गुलाबी फेटे घातलेल्या आमदारांच्या चेहऱ्यावर हसू छान छान असल्याचे दिसून आलं. तर दुसरीकडं भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांमध्येही मोठा उत्साह होता. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदार विधानभवन परिसरात दाखल झाले. विरोधकांचा रुसवा मात्र कायम राहिला. आज विरोधी आमदार शपथ घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी : विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आजपासून महाराष्ट्र विधानसभेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे.
![](https://ejanashakti.com/wp-content/uploads/2024/08/Banner1.jpg)