पुणे : महिंद्र अॅण्ड महिंद्रने चाकणमध्ये अत्याधुनिक विद्याुत वाहन (ईव्ही) निर्मिती प्रकल्प बुधवारी सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनीची ईव्ही क्षेत्रातील गुंतवणूक ४,५०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
चाकणमधील उत्पादन प्रकल्प ८८ हजार चौरस मीटरवर विस्तारलेला आहे. या प्रकल्पात कृत्रिम प्रज्ञेसह (एआय) इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
कंपनीने प्रकल्पात १ हजार यंत्रमानवांचा (रोबो) वापर केला असून, विविध स्वयंचलित यंत्रणा या ठिकाणी अंतर्भूत केल्या आहेत. महिंद्रच्या इलेक्ट्रिक ओरिजीन एसयूव्हींचे उत्पादन येथे होणार आहे. कंपनीने ईव्ही क्षेत्रात आर्थिक वर्ष २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीत १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन जाहीर केले आहे. त्यातील ४,५०० कोटी रुपयांचा निधी कंपनीने आतापर्यंत गुंतविला आहे.

)

