
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरष्णे (ता. बारामती) येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना ‘कॉन्ट्रॅक्टर लोकांना राजकारणाचे दरवाजे बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही’, अशी भूमिका मांडली आहे. जनतेमध्ये चीड निर्माण होते, अर्थातच पक्ष प्रमुख म्हणून आम्ही जनतेच्या त्या प्रचंड रोषाचे धनी होतो. याशिवाय अधिकाऱ्यांनाही सरकारी कामे दर्जेदार करण्यास अडथळा निर्माण होतो. हा दुहेरी तोटा आता मला सहन होत नाही. मी आठ वेळा आमदार झालो, यापुढे मी कसाही आमदार म्हणून सभागृहात जाईल, परंतु कॉन्ट्रॅक्टर लोकांना राजकारणाचे दरवाजे बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी नवी राजकीय भूमिका अजित पवार यांनी जाहीर केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, बारामतीसह राज्यात कॉन्ट्रॅक्टर राजकारणातून पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असतात. ही संख्या मोठी होत चालली आहे. अर्थात हे लोकांना आवडत नसल्याचे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले. ज्यांना राजकारण अथवा कार्यकर्ता व्हायचे आहे, त्यांनी कॉन्टॅक्टर क्षेत्रात यायचे नाही.



