
पुणे : प्रवासी म्हणून कारमध्ये बसून कारचालकाला मारहाण करुन त्याचा खुन करुन वाटेत मृतदेह टाकून कार चोरुन नेणार्याच्या टोळीचा ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. नाशिकमधील तिघांना अटक केली आहे.
विशाल आनंद चव्हाण (वय २२, रा. महेश अपार्टमेंट, गंगापूर रोड, नाशिक), मयुर विजय सोळसे (वय २३, रा. गोकुळवाडी, श्रीरंगनगर, नाशिक) आणि ऋतुराज विजय सोनवणे (वय २१, रा. गोकुळवाडी, गंगापूर रोड, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
युवराज शिंदे याने यापूर्वी इतर साथीदारांचे मदतीने अशा प्रकारचे गुन्हे पद्धतीचा अवलंब करुन इरटीगा कार जबरदस्तीने चोरुन नेली होती. त्याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हा दाखल आहे. आरोपी हे सराईत असून विशाल चव्हाण व मयुर सोळसे यांच्यावर गंगापूर (नाशिक) पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. युवराज शिंदे याच्यावर मालमत्ता चोरी व शरीराविरुद्धचे चार गुन्हे दाखल आहेत.
राजेश गायकवाड ह २७ जानेवारी रोजी नाशिक येथून इरटीगा कारने भाडे घेऊन पुण्यात आले होते. रात्री साडेदहा वाजता गायकवाड यांनी आपल्या पत्नीला फोन करुन पुण्याहून निघाल्याचे सांगितले. पण ते नाशिकला पोहचलेच नाही. त्यांचा मोबाईल पुणे -नाशिक महामार्गावरील संतवाडी रोडवरील समाधान हॉटेलमध्ये आहे, या माहितीच्या आधारे त्यांचे कुटुंबीय आळेफाटा येथे आले. त्यांनी शोध घेतल्यानंतरही न मिळाल्याने अगोदर हरविल्याची तक्रार नोंदविली. दरम्यान दुसर्या दिवशी संतवाडी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला.




