पुणे : खासगी शिकवणी वर्गांना उपस्थित राहून कनिष्ठ महाविद्यालयांतील नियमित वर्गांकडे पाठ फिरवण्याच्या, तसेच कमी विद्यार्थीसंख्येच्या कनिष्ठ महाविद्यालयांशी साटेलोटे करून शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची ‘परस्पर सोय’ लावण्याच्या प्रकारांना लगाम लावण्यासाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्याची चाचपणी शिक्षण विभाग करत आहे.
मुंबई-पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, लातूर अशा शहरांमध्ये नीट, जेईई, एमएचटी-सीईटी अशा प्रवेश परीक्षांची तयारी विद्यार्थी अकरावीपासूनच सुरू करतात. त्यासाठी विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश ‘७५ टक्के उपस्थितीचे बंधन’




