
नवी दिल्लीः संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. वक्फ (दुरुस्ती) विधेयकाचा विचार करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) अहवाल गुरुवारी राज्यसभेत मांडण्यात आल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झालाय. टीएमसी आणि काँग्रेसनं अहवालाला विरोध दर्शवलाय. गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं. सभापती जगदंबिका पाल यांनी विधेयकाशी संबंधित अहवाल आणि पुराव्यांचे रेकॉर्ड सभागृहाच्या टेबलावर ठेवले. त्याचवेळी लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. परंतु राज्यसभेत गोंधळ झालाय.
नवीन आयकर विधेयक आज सादर होणार : 31 जानेवारीपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 चे पहिले सत्र गुरुवारी संपण्याची अपेक्षा असल्याने सर्वांचे लक्ष नवीन आयकर विधेयकावर आहे, जे आज लोकसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे, तर संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चा अहवाल दोन्ही सभागृहात मांडण्यात आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर एका आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवीन आयकर विधेयक सादर करतील, अशी अपेक्षा आहे. या विधेयकाचा उद्देश विद्यमान आयकर कायदा, 1961ला सोपे आणि सुव्यवस्थित करणे आहे, जो सामान्य करदात्यांना अनेकदा समजण्यास कठीण वाटतो. दरम्यान, प्रमुख जगदंबिका पाल ‘पुराव्याच्या नोंदी’सह वक्फ अहवाल सादर केलाय. या अहवालाविरुद्ध विरोधकांनी आधीच असहमतीचे नोट्स सादर केले असल्याने दोन्ही सभागृहात गोंधळ सुरू आहे.