प्रयागराज : आतापर्यंत महाकुंभात जवळपास ५८ कोटींपेक्षा अधिक भाविकांनी पवित्र स्नान केल्याचा कुंभमेळा प्रशासनाने दावा केला आहे. आजही या पवित्र नद्यांच्या संगमावर स्नानासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
- हा आकडा ६५ कोटींच्या पुढे जाऊ शकतो
भाविकांचा येण्याचा ओघ असाच सुरू राहिला तर प्रशासनाच्या अंदाजानुसार स्नानार्थिंची संख्या ६५ कोटींचा आकडा पार करेल. महाकुंभाचे शेवटचे स्नान हे महाशिवरात्री २६ फेब्रुवारीच्या दिवशी होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून सव्वा कोटींहून अधिक भाविकांनी स्नानासाठी हजेरी लावली आहे. उरलेल्या ६ दिवसांत मोठ्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये दाखल होतील आणि रोज सव्वा कोटींहून अधिक भाविक पवित्र स्नान करतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.
महाकुंभ आणि संगमाप्रती भाविकांमध्ये असलेली श्रद्धा येथे होणाऱ्या गर्दीवर दिसून येत आहे. फाल्गुन महिन्यातही सलग सहाव्या दिवशी त्रिवेणी घाटावर स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या एक कोटीचा आकडा पार केला आहे. महाकुंभमेळा प्रशासनाच्या दाव्यानुसार आतापर्यंत ५८ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले आहे.
- सेंट्रल-जिल्हा कारागृहातील १४५० कैदी करणार पवित्र स्नान
केंद्रीय कारागृह नैनी आणि जिल्हा कारागृहात असलेले १४५० कैदी आज (शुक्रवार) जेलमध्येच पवित्र स्नान करणार आहेत. कैद्यांसाठी जेल प्रशासनाकडून जेलमध्येच पवित्र जल आणण्यात आले आहे. वरीष्ठ जेल अधिक्षक रंग बहादुर यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशावरून ही व्यवस्था करण्यात आली आहे. पवित्र जल आणल्याच्या वार्तेने कैद्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केंद्रीय कारागृहात जवळपास १७३५ बंदी शिक्षा भोगत आहेत. यामधील काही बंदी हे मुस्लीम धर्मातीलही आहेत. अशा परिस्थितीत १४५० कैद्यांना संगम किणाऱ्यावर स्नानासाठी घेवून जाण्याची योजना आहे. अधीक्षक रंग बहादूर यांनी सांगितले की, कैद्यांना स्नान करण्याची योजना सर्व कारागृहांमध्ये करण्यात आली आहे. याचबरोबर अनेक कारागृहांमध्ये भजन-किर्तनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
- महाकुंभाचा ४० वा दिवस, संगम स्नान सुरू
आज महाकुंभाचा ४० वा दिवस आहे. भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. महाकुंभ प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार ५८ कोटी लोकांनी गंगा स्नान केले आहे. दोन दिवसात भाविकांची संख्या ६० कोटींच्या पुढे पोहचू शकते. आजही भाविक उत्साहात संगमावर पवित्र स्नानाची पर्वणी साधत आहेत.