पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या कृतीने सर्वांची मने जिंकली. शरद पवार यांना बसण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आदराने खुर्ची ओढून दिली. एवढेच नव्हे तर, मोदी यांनी स्वतःच्या हाताने बाटलीतील पाणी ग्लासमध्ये भरून पवार यांना दिले.
पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात करताना सांगितले की, शरद पवारांच्या निमंत्रणावरूनच त्यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यास सहमती दर्शवली. ते म्हणाले की, आज शरद पवारजी यांच्या निमंत्रणावरून मला या गौरवशाली परंपरेत सामील होण्याची संधी मिळाली आहे.