छत्रपती संभाजीनगर : मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण एकिकडे विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव मांडण्यात आला आहे. तर दुसरीकडे, मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी परळी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळं मुंडेंवर दुहेरीं संकट ओढावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये भरलेल्या 19व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत ठराव मांडला गेला. मराठवाड्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी .चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे असा ठराव नाव न घेता संमत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडें विरोधात विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती .या तक्रारीवरून धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती .याबाबत आज परळीच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अटकेची टांगती तलवार
मुंडे आजा न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे, अशी माहिती वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली आहे. परळीच्या फौजदारी न्यायालया याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळं परळी न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
मुंडेंवर दुहेरी संकट
मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज सोबतच्या शपथपत्रात ,पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता .मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कोणताही उल्लेख केला नव्हता .त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत करुणा शर्मांनी तक्रार केली होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणा राज्यात संतापतेची लाट उसळली आहे. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढला आहे.



